Homeपुणेकुंभार समाजोन्नती मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न

कुंभार समाजोन्नती मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न

पुणे | प्रतिनिधी : दि. ६ जानेवारी २०२६            कुंभार समाजोन्नती मंडळाच्या वतीने सन २०२६ च्या समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन रविवारी  ४ जानेवारी २०२६ रोजी वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. ही सभा उद्योजक तथा माजी वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पाषाणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या प्रसंगी दिनदर्शिकेचे प्रकाशन  दत्तात्रय पाषाणकर, मंडळाचे अध्यक्ष बाबाजी कुंभार, कार्याध्यक्ष विशालशेठ शिंदे, ड्रीम इंडिया कंपनीचे सीईओ विजय पाटील, युवा अध्यक्ष रवींद्र कुंभार, पालखी सोहळा अध्यक्ष संतोषशेठ कुंभार, ह.भ.प. सोपान महाराज मोगरवाडकर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते पांडुरंग कार्लेकर गुरुजी, तसेच महिला आघाडी अध्यक्षा कल्पनाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात कोषाध्यक्ष संदीप कर्डेकर यांनी विद्यार्थी गुणगौरव व स्नेहमेळावा २०२५ चा जमा-खर्चाचा सविस्तर आढावा सादर केला. तसेच महिला आघाडी सचिव सविताताई कुंभार यांना सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यानंतर ड्रीम इंडिया कंपनीचे सीईओ  विजय पाटील यांनी उपस्थित समाजबांधवांना कर्ज (लोन) विषयक उपयुक्त मार्गदर्शन केले.

दरम्यान, जिल्हा महिला आघाडीच्या वतीने दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सावित्री गार्डन, धायरी, पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महिला मेळावा व हळदी-कुंकू समारंभा संदर्भात पुणे हवेली तालुका अध्यक्षा कविताताई धानेपकर यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, इंदापूर तालुकाध्यक्ष शशिकांत शिर्के, मावळ तालुकाध्यक्ष संतोष गामन्ना कुंभार, उपाध्यक्ष योगेश कुंभार, राजगड तालुकाध्यक्ष अंकुश कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दत्तात्रय पाषाणकर, अध्यक्ष बाबाजी कुंभार, पालखी सोहळा अध्यक्ष संतोषशेठ कुंभार, ह.भ.प. सोपान महाराज मोगरवाडकर व ह.भ.प. पांडुरंग कार्लेकर गुरुजी यांनी समाजबांधवांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच प्रकाश रसाळ सर यांनी गोरोबा काका यांच्यावर आधारित कवितेचे रसाळ सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या सभेसाठी जिल्हा सचिव दत्तात्रय पांगारकर यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!