हरीश शर्मा | मुख्य संपादक : दि.१२ जानेवारी २०२६ पुणे महापालिका निवडणूक जाहीर होताच प्रभाग क्रमांक ८ (औंध–बोपोडी) मध्ये राजकीय हालचालींना उधाण आले आहे.
कालपर्यंत शांत असलेले नेते आज अचानक जनतेच्या दुःखावर भाषणे देताना दिसत आहेत.
प्रश्न इतकाच आहे की ही सहानुभूती गेल्या पाच-दहा वर्षांत कुठे होती?
चेहरे तेच, झेंडे नवे
या प्रभागात आज निवडणूक म्हणजे विकासाची स्पर्धा नसून पक्षांतराची शर्यत झाली आहे.
काल जे उमेदवार एका पक्षावर टीका करत होते, तेच आज त्या पक्षाचे गुणगान करत आहेत.
विचार, निष्ठा, आणि जनसेवा या शब्दांची इथे केवळ जाहिरात उरली आहे.
बोपोडी आजही मागेच
महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही बोपोडी परिसर आजही
खराब रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई
या मूलभूत समस्यांमध्ये अडकलेला आहे.
औंधच्या विकासाचा गाजावाजा केला जातो, पण बोपोडीला कायम दुय्यम वागणूक.
प्रचारात आवाज, कामात शांतता
सभा, कॉर्नर मीटिंग, पोस्टरबाजी, सोशल मीडियावर घोषणा सुरू आहेत.
मात्र एकही उमेदवार स्वतःच्या मागील कामाचा ठोस हिशोब मांडायला तयार नाही.
कारण हिशोब मागितला, तर
अपयशाचे ओझे उघड होईल, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
मतदार मूर्ख नाही
या प्रभागातील मतदार आता फक्त घोषणा ऐकणारा नाही.
त्याने वर्षानुवर्षे आश्वासनांची किंमत मोजली आहे.
या वेळी मतदार प्रश्न विचारतोय –
आम्हाला चेहरे नकोत, कामाचा पुरावा हवा आहे.
इशारा स्पष्ट आहे
ही निवडणूक कोण जिंकेल, हे नंतर कळेल.
पण एवढं नक्की.
खोट्या प्रचारावर आणि राजकीय सोयीस्कर विस्मरणावर
या वेळी मतदार शिक्का मारणार नाही.
पुणे पीसीएमसी न्यूज 24.Live
आम्ही कोणाच्या बाजूने नाही,
आम्ही फक्त प्रश्नांच्या बाजूने आहोत.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















