Homeपुणेनिवडणुकीत अडथळ्याचा आरोप : ज्योती परदेशींचे प्रचार झेंडे काढले, व्हॉट्सॲप अकाउंट ब्लॉक!

निवडणुकीत अडथळ्याचा आरोप : ज्योती परदेशींचे प्रचार झेंडे काढले, व्हॉट्सॲप अकाउंट ब्लॉक!

बोपोडी | प्रतिनिधी : दि. १२ जानेवारी २०२६
पुणे महापालिका निवडणूक २०२६ अंतर्गत औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या ज्योती नागेश परदेशी यांना अज्ञात व्यक्ती कडून त्रास दिला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या कथित घटनांमुळे निवडणूक प्रचार प्रक्रियेतील सुरक्षितता व पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती परदेशी यांनी त्यांच्या घरासमोर कायदेशीररित्या प्रचारासाठी उभारलेली कचेरी वर लावलेले प्रचार झेंडे कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे प्रचार  व उमेदवाराच्या प्रचारावर अडथळा आणण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यासोबतच, त्यांच्या व्हॉट्सॲप अकाउंटबाबतही तांत्रिक अडचणी निर्माण केल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. परदेशी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून कोणालाही संदेश पाठवण्याचा प्रयत्न केला असता तो अकाउंट तात्पुरता ब्लॉक होत असून संदेश पोहोचत नाही. या प्रक्रियेमुळे सुमारे ३४ टक्के संपर्क (Contacts) ब्लॉक झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. प्रचाराच्या काळात डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना अशा प्रकारच्या अडचणी गंभीर मानल्या जात आहेत.
कायदेतज्ज्ञांच्या मते, निवडणूक काळात उमेदवाराच्या प्रचारात जाणूनबुजून अडथळा आणणे, प्रचार साहित्याची तोडफोड करणे किंवा डिजिटल माध्यमांद्वारे संपर्क तोडण्याचा प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ तसेच भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा यांच्या तरतुदींअंतर्गत गंभीर बाब ठरू शकते. अशा प्रकरणांमध्ये उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासन तसेच सायबर सेल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.

दरम्यान, या सर्व कथित अडथळ्यांनंतरही ज्योती नागेश परदेशी यांनी कोणतीही भीती न बाळगता प्रचार अधिक जोमाने सुरू ठेवला आहे. घराघरांत भेटी, मतदारांशी थेट संवाद आणि प्रत्यक्ष प्रचारावर त्यांनी अधिक भर दिला असून, “लोकशाही प्रक्रियेत कोणत्याही दबावाला बळी न पडता निवडणूक लढवणार,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि निवडणूक प्रक्रियेची पवित्रता अबाधित राखावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!