Homeक्राईमपुण्यातील खून प्रकरणातील फरार आरोपी ४८ तासांत जेरबंद

पुण्यातील खून प्रकरणातील फरार आरोपी ४८ तासांत जेरबंद

गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक-२ची धडाकेबाज कारवाई; वाळुंज टोलनाक्यावरून आरोपीला अटक

पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला अवघ्या ४८ तासांच्या आत पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने अटक केली आहे. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

लष्कर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 49/2026 अंतर्गत कलम 103(1), 49, 3(5) तसेच आर्म अ‍ॅक्ट 4(25) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी तालीम सय्यद हा फरार होता. दरम्यान, आरोपी स्वतःच्या ओळखीच्या टुरिस्ट कारमधून अहिल्यानगर येथे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस हवालदार अनिल कुसाळकर, पोलीस हवालदार प्रदीप परीट आणि पोलीस शिपाई गणेश खरात यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीचा पाठलाग सुरू केला. आरोपी ज्या टुरिस्ट वाहनातून फरार झाला होता त्या वाहनाच्या चालकाला शिरूर येथे ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान चालकाने आरोपीला सुपा ला जाणाऱ्या  रिक्षामध्ये बसवून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ती रिक्षा अहिल्यानगर रेल्वे स्थानक परिसरातून शोधून काढली. रिक्षाचालकाची चौकशी केली असता आरोपीला भिंगार कॅम्प येथील दमडी मशीद परिसरात सोडल्याचे समोर आले.
पुढील तपासात आरोपीच्या मित्राकडून माहिती मिळाली की आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी निघाला आहे. त्यानुसार पोलिसांनी वाळुंज पोलीस स्टेशनच्या मदतीने सापळा रचत वाळुंज नाका येथे आरोपीला ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राम राजमाने (खंडणी विरोधी पथक-२) यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!