पुणे / पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क : महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येत असताना, पुणे शहर भाजप कार्यालयात आज उमेदवारी अर्ज घेण्याच्या पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी उसळली. सकाळपासून कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांची रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. पक्षाच्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी तब्बल २००० अर्ज जमा झाले आहेत.
भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवार इच्छुकांनी प्रभागनिहाय अर्ज सादर करताना स्वतःची कामगिरी, समाजकार्य, स्थानिक संपर्क असे विविध तपशील जोडले. काही प्रभागांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आले असून, पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपा कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्जांची प्राथमिक छाननी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा व राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवले जातील. पुढील काही दिवसांत मुलाखती, शेरा तपासणी आणि स्थानिक स्तरावरील मतमतांतरे पाहून प्रदेश कार्यकारिणी कडे नावे पाठवली जातील त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.
पुण्यातील 165 प्रभागांसाठी उमेदवारीची प्रक्रिया सुरू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपच्या प्रतिसादामुळे इतर पक्ष देखील त्यांच्या यादीच्या तयारीला वेग देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















