पिंपरी-चिंचवड / प्रतिनिधी: दि. २४ ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीय समाजामध्ये श्रद्धेचा आणि परंपरेचा उत्सव मानला जाणारा छठ पूजेचा भव्य सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हनुमान मित्र मंडळाच्या वतीने चिंचवड गावातील पवना नदी घाटावर (हॉटेल रिव्हर ह्यू, गणपती विसर्जन घाट येथे) हा सोहळा २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर हनुमान मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक, आरोग्य अधिकारी, विद्युत विभाग व महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक परवानग्या आणि सुविधा पुरविण्याबाबत निवेदन सादर केले आहे.
निवेदनात घाट परिसराची स्वच्छता, सार्वजनिक वीज व्यवस्था करणे, किटकनाशक फवारणी, नदीपात्रात पाणी सोडणे, वाहतूक आणि पोलीस बंदोबस्त यांसह अनेक मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यक्रमास २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता प्रारंभ होईल आणि २८ ऑक्टोबर रोजी सूर्योदय अर्घ्याने सांगता होईल. या काळात धार्मिक विधींबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उत्तर भारतीय समाजातील महिला, पुरुष व बाल-गोपाल मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या सोहळ्यात सूर्यास्त व सूर्योदयाच्या वेळी भक्त पवना नदीत उभे राहून सूर्यदेवतेची पूजा-अर्चना करतील.
प्रमुख पदाधिकारी व आयोजक मंडळ :
अध्यक्ष – जितेंद्र के. गुप्ता
कार्याध्यक्ष – शशिकांत श्रीवास्तव (पूर्वाचल विकास मंच)
कार्याध्यक्ष – विजय आर. गुप्ता
संस्थापक – जयप्रकाश नारायणप्रसाद गुप्ता
फिल्म प्रोड्युसर – विकास मिश्रा
उपाध्यक्ष – देवानंद गुप्ता
तसेच समिती सदस्य व पदाधिकारी : जितेंद्र गुप्ता, मुन्ना डी. गुप्ता, अनिल एस. गुप्ता, उमा के. गुप्ता, सचितानंद मिश्रा, टी. एन. तिवारी, सुभाष एम. गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मदन आर. गुप्ता, पप्पु डी. गुप्ता, सुजित एम. गुप्ता, शंकर गुप्ता, शंभू गुप्ता, रमेश गुप्ता, भोला बी. गुप्ता, मनोज आर. गुप्ता, राजेश जे. गुप्ता, विनोद गुप्ता, संतोष गुप्ता, संजिव आर. गुप्ता, प्रिंस गुप्ता, विनोद जे. गुप्ता, प्रविण एम. गुप्ता, राजकुमार गुप्ता, नरेंद्र जि. गुप्ता आदी पदाधिकारी नियोजनात सहभागी आहेत.
असा असेल छठ पूजेचा कार्यक्रम :
बडकी छठ (संध्या अर्घ्य) – २७ ऑक्टोबर २०२५ (सोमवार), सूर्यास्त – सायं. ६:०४ वाजता
पारण (प्रातः अर्घ्य) – २८ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), सूर्योदय – सकाळी ६:३३ वाजता
विजय आर. गुप्ता यांनी सांगितले की,
“छठ पूजा ही उत्तर भारतीय समाजाची श्रद्धेची पर्वणी आहे. पवना नदीकिनारी दरवर्षी अत्यंत भक्तीभावाने हा सोहळा पार पडतो. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवाची शोभा वाढवावी.”
छायाचित्र – काल्पनिक

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















