पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी उपजीविकेसाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी विक्रेत्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यात यावे आणि कारवाई करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा, अशी ठाम भूमिका नखाते यांनी मांडली.
तसेच, हातगाडी व स्टॉलधारकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहावे आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
याप्रसंगी काशिनाथ नखाते यांनी, “कष्टकरी विक्रेत्यांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष कायम राहील. त्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरोधात आम्ही ठामपणे उभे राहू,” असे स्पष्ट केले.
– पुणे पीसीएमसी न्यूज 24 Live

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏















