पुणे | प्रतिनिधी : दि. ६ जानेवारी २०२६ कुंभार समाजोन्नती मंडळाच्या वतीने सन २०२६ च्या समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन रविवारी ४ जानेवारी २०२६ रोजी वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. ही सभा उद्योजक तथा माजी वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पाषाणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या प्रसंगी दिनदर्शिकेचे प्रकाशन दत्तात्रय पाषाणकर, मंडळाचे अध्यक्ष बाबाजी कुंभार, कार्याध्यक्ष विशालशेठ शिंदे, ड्रीम इंडिया कंपनीचे सीईओ विजय पाटील, युवा अध्यक्ष रवींद्र कुंभार, पालखी सोहळा अध्यक्ष संतोषशेठ कुंभार, ह.भ.प. सोपान महाराज मोगरवाडकर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते पांडुरंग कार्लेकर गुरुजी, तसेच महिला आघाडी अध्यक्षा कल्पनाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात कोषाध्यक्ष संदीप कर्डेकर यांनी विद्यार्थी गुणगौरव व स्नेहमेळावा २०२५ चा जमा-खर्चाचा सविस्तर आढावा सादर केला. तसेच महिला आघाडी सचिव सविताताई कुंभार यांना सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यानंतर ड्रीम इंडिया कंपनीचे सीईओ विजय पाटील यांनी उपस्थित समाजबांधवांना कर्ज (लोन) विषयक उपयुक्त मार्गदर्शन केले.
दरम्यान, जिल्हा महिला आघाडीच्या वतीने दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सावित्री गार्डन, धायरी, पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महिला मेळावा व हळदी-कुंकू समारंभा संदर्भात पुणे हवेली तालुका अध्यक्षा कविताताई धानेपकर यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, इंदापूर तालुकाध्यक्ष शशिकांत शिर्के, मावळ तालुकाध्यक्ष संतोष गामन्ना कुंभार, उपाध्यक्ष योगेश कुंभार, राजगड तालुकाध्यक्ष अंकुश कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दत्तात्रय पाषाणकर, अध्यक्ष बाबाजी कुंभार, पालखी सोहळा अध्यक्ष संतोषशेठ कुंभार, ह.भ.प. सोपान महाराज मोगरवाडकर व ह.भ.प. पांडुरंग कार्लेकर गुरुजी यांनी समाजबांधवांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच प्रकाश रसाळ सर यांनी गोरोबा काका यांच्यावर आधारित कवितेचे रसाळ सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या सभेसाठी जिल्हा सचिव दत्तात्रय पांगारकर यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















