बोपोडी / प्रतिनिधी : दि. १३ डिसेंबर २०२५ औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून आगामी महानगरपालिका निवडणूक लढविण्याची तयारी युवा नेत्या ज्योती परदेशी यांनी दर्शवली असून त्यांनी काँग्रेस (आय) पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारी साठी फॉर्म भरून उमेदवारीची मागणी केली आहे. परिसरात भाजपची मोठ्या प्रमाणावर चर्चा असतानाही, ज्योती परदेशी यांनी काँग्रेस पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवत सातत्याने पक्षाचे काम सुरू ठेवले आहे.
१९९६ साली काँग्रेसच्या कार्यातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या ज्योती परदेशी यांनी गेली अनेक वर्षे पक्षाचा झेंडा प्रामाणिकपणे हातात धरून ठेवला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत अनेक नेते पक्षांतर करत असताना, त्यांनी काँग्रेसशी असलेली आपली बांधिलकी कधीही सोडलेली नाही, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते.

स्थानिक पातळीवर सामाजिक प्रश्न, नागरी सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींसाठी सातत्याने काम करणाऱ्या ज्योती परदेशी यांची औंध–बोपोडी परिसरात एक विश्वासार्ह आणि जनाधार असलेली ओळख आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्या केवळ कार्यकर्त्या न राहता नागरिकांच्या प्रश्नांसाठी धावून जाणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
अशा प्रामाणिक आणि निष्ठावान नेत्या म्हणून ओळख असलेल्या ज्योती परदेशी यांना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व ( प्रभाग क्रमांक ८ ब महिला ओबीसी सर्वसाधारण ) मधून उमेदवारी देण्याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे पीसीएमसी न्यूज 24.Live बातमी व जाहिरात तसेच इच्छुक उमेदवार संपर्क : 9822220090

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















