पुणे / प्रतिनिधी: दि. ३१ ऑक्टोबर
इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जतर्फे Official District Chairman Visit हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुवर्णा गायकवाड आणि त्यांच्या कन्या प्रतिक्षा वाघमारे यांच्या भावपूर्ण गणेश वंदनाने झाली.
कार्यक्रमादरम्यान क्लब प्रेसिडेंट उज्ज्वला नवले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पाच वर्षीय प्रवास’ या क्लबच्या इतिहास पुस्तकाचे प्रकाशन District Chairman डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुळशी तालुक्यात गेली ३३ वर्षे उत्कृष्ट सेवा देणारे सुदाम पवार सर यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ‘ पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live ‘ संचालक संपादक हरीश शर्मा यांचाही सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या District Chairman डॉ. आशा देशपांडे यांनी क्लबच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. त्यांनी महिलांनी इनरव्हीलच्या माध्यमातून समाजसेवेची वाट अधिक व्यापक करावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन क्लब प्रेसिडेंट उज्ज्वला नवले, सेक्रेटरी सुविधा नाईक तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि क्लब सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शक्य झाले. सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अत्यंत सुंदर, उत्साही आणि स्मरणीय बनविला.
कार्यक्रमादरम्यान इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही सादर करण्यात आली. या कार्यक्रमाने “Together We Can, Together We Will” हा प्रेरणादायी संदेश प्रत्यक्षात उतरवला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















