पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी / बातमीदार
चिखलवाडी येथील पाण्याच्या टाकीच्या उदघाटन करण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये चढाओढ
प्रशासनाचा कार्यक्रम नाही मग कारवाई का नाही :विनोद रणपिसे ?
बोपोडी : प्रभाग क्र. 8 अंतर्गत चिखलवाडी येथील 3 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा सध्या मोठ्या राजकीय गदारोळाचे कारण ठरत आहे. ज्या पाण्याच्या टाकीसाठी सामान्य नागरिक गेली चार महिने तहानलेले होते, त्या टाकीच्या उद्घाटनावरून आता क्रेडिट घेण्याची चढाओढ सुरु आहे. श्रेयाच्या निषेधार्थ आज काँग्रेस च्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरचिटणीस शरद रणपिसे, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, सेल्वराज अँथोनी, नंदलाल धिवार, ज्योती परदेशी सह शंभर ते दीडशे महिला सहभागी झाले होते. औंध रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चिखलवाडी टाकी पर्यंत कॉग्रेसच वतीने मोर्चा काढून घोषणाबाजी करित जल जन आंदोलन करून नारिकांसाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.
पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी मनपा तर्फे कुठला ही प्रस्ताव नाही, तर दुसरी कडे प्रशासनाकडून सांगण्यात येते की माजी सदस्यांनी घेतलेला हा अशासकीय आहे मग मनपा च्या जागेत अनाधिकृत मंडप बांधून कार्यक्रम केला जात आहे. आयुक्त अशा अनाधिकृत मंडप बांधून अशासकीय कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल उदघाटन प्रसंगी अरविंद शिंदे यांनी थेट पुणे मनपा आयुक्तांना विचारला आहे.
.जेव्हा महापालिकेच्या म्हणण्यानुसार टाकीचे काम पूर्णच झालेले नाही, तेव्हा उद्घाटन कोणत्या आधारावर? अनधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व आमदार सहभागी होणार का? अशा कार्यक्रमावर कारवाई कोण करणार? असा आरोप ही विनोद रणपिसे यांनी केला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की पाण्याच्या टाकीचा लाभ जनतेला मिळावा म्हणून काँग्रेसने वृद्ध नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पाण्याचा प्रश्न जिथे लोकांच्या जगण्याशी निगडीत आहे, तिथे काही माजी नगरसेवक हे केवळ स्वतःचे राजकीय मार्केटिंग आणि श्रेय घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्घाटनाचा घाट घालत आहेत.नगरसेवक नाहीत, तरीही उद्घाटनात झेंडे आणि चेहरे! प्रशासन म्हणते टाकी अपूर्ण, पण काहीजण म्हणतात उद्घाटन करायचं! हे माजी नगरसेवक आज नगरसेवक नाहीत, पण मालक असल्यासारखे वागतात!
शेवटी, विनोद रणपिसे यांचे स्पष्ट मत आहे की जर खरोखर उद्घाटन अधिकृत असेल, तर महापालिका आयुक्तांनी त्या ठरावाची प्रत दाखवावी मी स्वतः उद्घाटनात सहभागी होईन! पण जर केवळ श्रेयासाठी नागरिकांच्या भावनांशी खेळू नये.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















