Homeपुणेरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नू. म. वि. प्रशाला, बाजीराव रोड, पुणे येथे भव्य वाद्यपूजन सोहळा आणि ‘पहिले आवर्तन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याबरोबरच तरुणांना सर्जनशीलतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सोहळ्यात पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार मा. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री, पुणे जिल्हा) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मंजुषाताई नागपुरे उपस्थित राहणार असून अपूर्व दत्तात्रय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) यांनी केले आहे.

दशकपूर्तीनिमित्त ट्रस्टतर्फे आकर्षक इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ₹५,००१, द्वितीय ₹३,००१ आणि तृतीय ₹२,००१ रोख पारितोषिकासह ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपली रील ट्रस्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजसोबत Collaboration करून पोस्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेचा निकाल २८ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असून प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.
रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टने पुणे शहरातील वाद्यप्रेमी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, वादक तसेच नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

सिंहगडावरील कथित वादग्रस्त फलक हटविला; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू – पुणे ग्रामीण पोलीस

खडकी | प्रतिनिधी : दि. 15 जुलै 2026              सिंहगड किल्ला परिसरात लावण्यात आल्याचा दावा असलेल्या वादग्रस्त फलक प्रकरणात...

error: Content is protected !!