सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा
हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026 नेरे गावचे सुपुत्र, माजी आदर्श सरपंच तथा युवा उद्योजक मा. सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा नेरे गावठाण व दत्तवाडी येथील विद्यार्थ्यांना सुमारे ५०० शालेय गणवेशांचे, तसेच समस्त नेरे ग्रामस्थांना ३,००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत सचिनभाऊ जाधव हे गावातील नागरिकांसाठी सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी रस्ते, वीज, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आदी विकासकामांना गती देत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले. अनेक विकासकामे स्वखर्चातून पूर्ण करून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी जिल्हा परिषद गटनेते शिवाजीराव बुचडे पाटील, पंचायत समिती सदस्या ऐश्वर्याताई वाघमारे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दत्ताभाऊ जाधव, सरपंच वंदनाताई जाधव, माजी सरपंच दिगंबर जाधव, माजी उपसरपंच दत्ताभाऊ गाढवे, अरुण ढमाले, निलेश विलास जाधव, भाजपा प्रवक्ते साहेबराव जाधव, उपसरपंच विदुर जाधव, जालिंदर जाधव, राजकीय सल्लागार महेश गोरे, मनसे उपाध्यक्ष गणेश शिंदे, भाजप नेते राहुल जाधव, युवराज पायगुडे, युवा उद्योजक तेजस शिंदे, उपसरपंच अजित ओव्हाळ, हभप लक्ष्मण जाधव, दत्तात्रय शंकर जाधव, दत्तात्रय विलास जाधव, युवा उद्योजक सुनील जाधव, उद्योजक वैभव राऊत, युवा उद्योजक गणेश जाधव, माजी उपसरपंच शरद शिंदे, तुकाराम दातीर, विराज सातपुते, माऊली दातीर, कृष्णा जाधव, अनिल जाधव, भरत जाधव, विश्वास जाधव, अक्षय गाढवे, समीर जाधव, उद्योजक नवनाथ जाधव, हिरामणभाऊ जाधव, दशरथ खाणेकर, संभाजी ज्ञानोबा जाधव, विनोद आब्बा जाधव, महेश जाधव, बबन जाधव, संभाजीभाऊ जाधव, जगन्नाथ जाधव, बाळासाहेब सुर्वे यांच्यासह नेरे गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या सेवाभावी उपक्रमामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी सचिनशेठ जाधव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मा. सचिनशेठ जाधव यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अखंड प्रेरणा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुणे पीसीएमसी न्यूज 24 संपादक : हरीश शर्मा 9822220090

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏















