सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील पत्रकार बांधवांचे आधारस्तंभ; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
पुणे | प्रतिनिधी : दी. 8 जून 2026
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पत्रकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सांगवी व पिंपळे गुरव परिसरात पत्रकारितेच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे संजय मराठे हे पत्रकार बांधवांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात. तसेच ते सांगवी पोलीस स्टेशन शांतता समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क यामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकार संघटनात्मक बळकटीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास पत्रकार बांधवांनी व्यक्त केला आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















