Homeपिंपरी चिंचवड'ड' प्रभाग कार्यालयावर फेरीवाल्यांचा हल्लाबोल; बेकायदेशीर कारवाई विरोधात तीव्र आंदोलन

‘ड’ प्रभाग कार्यालयावर फेरीवाल्यांचा हल्लाबोल; बेकायदेशीर कारवाई विरोधात तीव्र आंदोलन

“स्टॉल हटवा, अन्यथा कारवाई”च्या दमाला विक्रेत्यांचा विरोध; कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

पिंपळे सौदागर | पुणे पीसीएमसी न्यूज 24.live          दि. 18 एप्रिल 2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाकडून फेरीवाल्यांवर होत असलेल्या कथित अन्यायकारक व बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ आज रहाटणी-काळेवाडी येथील ‘ड’ प्रभाग कार्यालयावर विक्रेत्यांनी जोरदार आंदोलन छेडले. “स्टॉल आणि हातगाड्या हटवा, अन्यथा तीन दिवसांत कारवाई करू” असा दम दिला जात असल्याचा आरोप करत विक्रेत्यांनी प्रशासनाला थेट जाब विचारला.
नॅशनल हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यासह पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, शैलेंद्र गाडे, लक्ष्मण शेरखाने, इरफान चौधरी, सागर कापूरे, मनोज रुपनवर, सुनील भोसले, संतोष बनगर, राजेश माने, नंदू आहेर, रवींद्र गायकवाड, सुषमा शेगावकर, स्वाती दिलापाक, ज्योती ढाकरे, अनाया सावंत, विशाल इचके, सखाराम केदार, लाला राठोड, अशोक पगारिया, झरीना शेख, अंबालाल सुखावल, प्रमोद बोंबले, भाऊ तांबे, अर्चना दिवेकर, रेखा कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, महानगरपालिका फेरीवाला कायद्याची योग्य अंमलबजावणी करत नसून गरजू व गरीब विक्रेत्यांवर जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे. एकीकडे अनियमित आठवडे बाजारांना संरक्षण दिले जाते, तर दुसरीकडे लहान विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई केली जाते. कारवाईदरम्यान अपमानास्पद वागणूक आणि शिवराळ भाषेचा वापर होत असल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच विक्रेत्यांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी काशिनाथ नखाते यांनी इशारा देताना सांगितले की, “महानगरपालिकेने तात्काळ फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर पुढील काळात बेमुदत उपोषण करण्यात येईल.”

आंदोलनानंतर प्रतिनिधींनी क्षेत्रीय प्रभारी अधिकारी पूजा दुधनाळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत दुधनाळे यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेऊन लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, तसेच भाकर झोनसंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, “फेरीवाला एकजुटीचा विजय असो”, “लढेंगे… जितेंगे…” आणि “बेकायदेशीर कारवाईचा निषेध असो” अशा घोषणांनी ड प्रभाग कार्यालय परिसर दणाणून गेला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!