Homeपुणेचालकांशिवाय ॲप कंपन्या ठप्प! कॅब-रिक्षा बंदाचा राज्यभर जबरदस्त परिणाम

चालकांशिवाय ॲप कंपन्या ठप्प! कॅब-रिक्षा बंदाचा राज्यभर जबरदस्त परिणाम

मनमानी भाड्याचा पर्दाफाश! कॅब-रिक्षा चालकांचा बंद राज्यभर यशस्वी

पुणे | प्रतिनिधी : दि. 7 फेब्रुवारी 2026
ॲप-आधारित कॅब कंपन्यांच्या मनमानी धोरणांविरोधात आणि बाईक टॅक्सीला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाविरोधात कॅब व रिक्षा चालकांनी पुकारलेला एकदिवसीय बंद आज संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी ठरला. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह अनेक शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागातही बंदचा मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून आला.
आजच्या बंदमध्ये 70 ते 80 टक्के कॅब व रिक्षा रस्त्यावर उतरल्या नाहीत. परिणामी प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी कमी झाल्याचेही चित्र दिसून आले. ॲप-आधारित कंपन्यांच्या ड्रायव्हर ॲपवर बहुतांश भाग लाल रंगात दिसत होते, यावरून त्या भागांमध्ये वाहनांची तीव्र कमतरता असल्याचे स्पष्ट झाले.

बंददरम्यान अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या कॅब सेवांचे भाडे नेहमीपेक्षा तीन ते चार पटीने वाढल्याचे राज्यभर पाहायला मिळाले. वाहनांची अनुपलब्धता आणि अवाजवी भाडेवाढीमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यामुळे चालकांशिवाय ॲप-आधारित कंपन्या चालू शकत नाहीत, हे वास्तव ठळकपणे समोर आले.
या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, “आजच्या परिस्थितीने हे सिद्ध झाले आहे की कॅब व रिक्षा चालकांच्या श्रमांवरच ॲप-आधारित कंपन्यांचा व्यवसाय उभा आहे. चालकांवर अन्यायकारक धोरणे लादली गेली तर त्याचा थेट फटका प्रवाशांनाच बसतो.”
या बंदामागील प्रमुख कारणांमध्ये Ola, Uber आणि Rapido यांसारख्या ॲप-आधारित कंपन्यांकडून परिवहन विभागाच्या नियमांचे होणारे उल्लंघन, मनमानी भाडे धोरण, जादा कमिशन, चालकांच्या उत्पन्नातील घट, परवाना व विमा अटींचे उल्लंघन आणि प्रवासी सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. शासनाकडून या बेकायदेशीर बाबींवर ठोस कारवाई न होणे, हा चालकांच्या संतापाचा मुख्य मुद्दा ठरला आहे.
बंदामागील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाईक टॅक्सीला असलेला ठाम विरोध. कोणतीही स्पष्ट कायदेशीर चौकट, परवाना व्यवस्था, विमा संरक्षण किंवा प्रवासी सुरक्षेची हमी नसताना बाईक टॅक्सीला परवानगी देणे हे रस्ते सुरक्षिततेस धोका निर्माण करणारे असून पारंपरिक रिक्षा व कॅब चालकांच्या उपजीविकेवर थेट आघात करणारे असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
एकदिवसीय बंद असूनही राज्यभर चालकांनी स्वयंस्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद हा या प्रश्नांची तीव्रता दर्शवतो. कमिशन दर, मनमानी भाडे धोरण, ॲप-आधारित कंपन्यांची दादागिरी आणि बाईक टॅक्सी धोरणाबाबत सरकारने तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चालकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काळात अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!