पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी / प्रतिनिधी : भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती खडकी बाजारातील महात्मा गांधी चौक येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व आदरांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेस चे बोपोडी विभागातील राजेंद्र भुतडा, ज्योती परदेशी, नूर सय्यद, विनोद रणपिसे तसेच काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विनोद रणपिसे यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस उजाळा देत भाषण केले.
कार्यक्रमाचे आयोजन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी ब्लॉक अध्यक्ष सेलवराज अं थोनी यांनी केले होते गेल्या अनेक वर्षांपासून सेलवराज अंथोनी हे खडकी विभागात काँग्रेस ची धुरा सांभाळत असून खडकी परिसरात एकनिष्ठ काँग्रेस चे म्हणून त्यांची ओळख आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















