Homeक्राईमकोण म्हणतं हरवलेले चोरीला गेलेले मोबाईल परत मिळत नाही ? शिवाजीनगर पोलीस...

कोण म्हणतं हरवलेले चोरीला गेलेले मोबाईल परत मिळत नाही ? शिवाजीनगर पोलीस ठाणे पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीचे 41 मोबाईल तक्रारदारांना केले परत

पुणे पीसीएमसी न्यूज 24: Live

पुणे : विविध ठिकाणांहून  हरविलेले  चोरीला गेलेले ४१ मोबाईल शोधून पोलिसांनी ते मुळ मालकांना १५ ऑगस्ट स्वांतत्र दिनी परत केले आहे . या मोबाईलची किंमत साधारत ५ लाख रुपये असून ते विविध जिल्ह्यातुन तसेच विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदारांना परत करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने परिश्रम घेतले.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले की  शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अमंलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी, यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन, त्याबाबत तांत्रिक तपास करुन त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व  इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्याशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस संवाद साधून हरवलेले एकुण ५ लाख ररूपे किंमतीचे एकुण ४१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे परीमंडळ  १ चे पोलीस उपआयुक्त, कृषीकेश रावले व तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, साईनाथ ठोंबरे यांचे हस्ते परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
पोलिसांनी असेही म्हटले आहे कि’मोबाईल तात्काळ ऑनलाईन हरवल्याची पुणे पोलीसांचे punepolice.gov.in/LostFoundReg या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंद करावी, नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशनचे नाव त्यात सिलेक्ट करावे व आपले जवळच्या पोलीस स्टेशनला जावुन त्याची एक कॉपी द्यावी. त्यानंतर हरवलेले मोबाईल मधील त्याच नंबरचे नविन सिमकार्ड घेवुन ते चालु करुन घेतल्यानंतर शासनाचे https://www.ceir.gov.in/ (CEIR) या पोर्टलवर नोंद करावी. नोंद करताना सदर वेबसाईटवर अर्जदाराचे तक्रारीची प्रत, मोबाईल पावती तसेच ओळखपत्र याची PDF अपलोड करुन चालु केलेल्या मोबाईल वर OTP प्राप्त करुन समाविष्ठ (सबमिट) करावी.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १ कृषीकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि . महेश बोळकोटगी, पोनि (गुन्हे) धंनजय पिंगळे, सपोनि संतोष पाटील, मपोउप मनिषा वलसे, मपोहवा नलिनी क्षीरसागर, पोशि आदेश चलवादी, पोशि तेजस चोपडे, पोशि नवनाथ आटोळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!