पुणे पीसीएमसी न्यूज 24:
पुणे : पिंपरी चिंचवड कलाकार संघ तर्फे दरवर्षी कलाक्षेत्रात कलाप्रसार करीत आपला ठसा उमटवणाऱ्या कलाकारांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी चा “कलागौरव पुरस्कार २०२५” साठी पुणे शहरातील सुप्रसिद्ध गायिका “उर्मिला कावडे” यांची निवड करण्यात आली असुन पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे यांनी कावडे यांच्या नावाची घोषणा करून त्यांना सन्मान पत्र दिले असून , रविवार ता. २४ ऑगस्ट सांयकाळी ६ वाजता नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे उर्मिला कावडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
उर्मिला कावडे या संगीत आणि कलाक्षेत्रात मागील ३५ वर्षांपासून असून त्यांनी अनेक नवीन जुने मराठी हिंदी गाणे गायले असून त्यांना अनेक वेळा विविध संस्था संघटनेतर्फे पुरस्काराने सन्मानित केले आहेत. ते चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका ‘ आशा भोसले ‘ यांना आपले आदर्श मानतात. तसेच स्व.मोहम्मद रफी फॅन्स क्लब पुणे शहर चे त्या क्रियाशील सदस्या आहेत.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














