Homeपुणेअशासकीय उदघाटनासाठी बांधलेल्या स्टेज साठी कायदेशीर कारवाई होणार का ? अरविंद शिंदे*

अशासकीय उदघाटनासाठी बांधलेल्या स्टेज साठी कायदेशीर कारवाई होणार का ? अरविंद शिंदे*

पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी / बातमीदार

चिखलवाडी येथील पाण्याच्या टाकीच्या उदघाटन करण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये चढाओढ

प्रशासनाचा कार्यक्रम नाही मग कारवाई का नाही :विनोद  रणपिसे  ? 

  बोपोडी : प्रभाग क्र. 8 अंतर्गत चिखलवाडी येथील 3 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा सध्या मोठ्या राजकीय गदारोळाचे कारण ठरत आहे. ज्या पाण्याच्या टाकीसाठी सामान्य नागरिक गेली  चार महिने तहानलेले होते, त्या टाकीच्या उद्घाटनावरून आता क्रेडिट घेण्याची चढाओढ सुरु आहे. श्रेयाच्या निषेधार्थ आज काँग्रेस च्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  सरचिटणीस शरद रणपिसे, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, सेल्वराज अँथोनी, नंदलाल धिवार, ज्योती परदेशी सह शंभर  ते दीडशे महिला  सहभागी झाले होते. औंध रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चिखलवाडी टाकी पर्यंत कॉग्रेसच वतीने मोर्चा काढून घोषणाबाजी करित जल जन आंदोलन करून नारिकांसाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.
पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी मनपा तर्फे कुठला ही प्रस्ताव नाही, तर दुसरी कडे प्रशासनाकडून सांगण्यात येते की माजी सदस्यांनी घेतलेला हा अशासकीय आहे मग मनपा च्या जागेत अनाधिकृत मंडप बांधून कार्यक्रम केला जात आहे. आयुक्त अशा अनाधिकृत मंडप बांधून अशासकीय कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल उदघाटन प्रसंगी अरविंद शिंदे यांनी थेट पुणे मनपा आयुक्तांना विचारला आहे.

.जेव्हा महापालिकेच्या म्हणण्यानुसार टाकीचे काम पूर्णच झालेले नाही, तेव्हा उद्घाटन कोणत्या आधारावर? अनधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व आमदार सहभागी होणार का? अशा कार्यक्रमावर कारवाई कोण करणार? असा आरोप ही विनोद रणपिसे यांनी केला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की पाण्याच्या टाकीचा लाभ जनतेला मिळावा म्हणून काँग्रेसने  वृद्ध नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पाण्याचा प्रश्‍न जिथे लोकांच्या जगण्याशी निगडीत आहे, तिथे काही माजी नगरसेवक हे केवळ स्वतःचे राजकीय मार्केटिंग आणि श्रेय घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्घाटनाचा घाट घालत आहेत.नगरसेवक नाहीत, तरीही उद्घाटनात झेंडे आणि चेहरे! प्रशासन म्हणते टाकी अपूर्ण, पण काहीजण म्हणतात उद्घाटन करायचं! हे माजी नगरसेवक आज नगरसेवक नाहीत, पण मालक असल्यासारखे वागतात!
शेवटी, विनोद रणपिसे यांचे स्पष्ट मत आहे की जर खरोखर उद्घाटन अधिकृत असेल, तर महापालिका आयुक्तांनी त्या ठरावाची प्रत दाखवावी मी स्वतः उद्घाटनात सहभागी होईन! पण जर केवळ श्रेयासाठी नागरिकांच्या भावनांशी खेळू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!