-
पुणे पीसीएमसी न्यूज २४: पुणे / न्यूजनेटवर्क
पुणे डिस्ट्रिक्ट कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन च्या वतीने १८ वर्षावरील मुलांची कराटे जिल्हास्तरीय निवड चाचणी काळेपडळ हडपसर येथे संपन्न झाली या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील कराटे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता ४६ महाराष्ट्र कराटे स्पर्धा मुंबई येथे होणार आहे या स्पर्धेकरिता ही निवड चाचणी घेण्यात आली .
“या जिल्हास्तरीय स्पर्धेतून JKNSKI कराटे इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी ओम पांडे व तेजस पांडे यांची निवड राज्यस्तरीय कराटे स्पर्धा २०२५ करण्यात आली आहे.”
याप्रसंगी केंन्सी कमलेश पांडे, केंन्सी गजानन जेडियार्मा स्पर्धेला निरीक्षक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख सिहान सोमेश्वर एलचलवार उपस्थित होते. यशस्वी खेळाडूचे सिहान लहू पारवे यांनी अभिनंदन केले सदरील स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सेन्साई माधवी तसेच अनुराग पारवे, अर्णव गायकवाड, प्रथमेश कांबळे, विकास ताटे, वैष्णवी मिठापल्ली यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















