पिंपळे सौदागर / प्रतिनिधी : दि. १३ डिसेंबर २०२५ माजी सरपंच स्व. गोविंदराव तांबे चारिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मधील महिलांसाठी खास ‘लाडक्या बहिणींसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण ओम यादव करणार आहेत.
या कार्यक्रमात उपस्थित लाडक्या बहिणींसाठी लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. लकी ड्रॉमधून
टू-व्हीलर, टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज तसेच मिक्सर अशी मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. प्रत्येक बक्षिसासाठी प्रत्येकी चार लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या महिलांना ड्रॉ दिला जाणार आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला असून, स्थळ कापसे लॉन्स, रहाटणी, पुणे–१७ येथे कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन देविदास (आप्पा) सुमन, गुलाबराव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये, असे आयोजकांनी आवर्जून सांगितले आहे.
लकी ड्रॉसाठी आवश्यक टिप कूपन आधीच कार्यालयात जमा करणे अनिवार्य असल्याची माहितीही आयोजकांकडून देण्यात आली आहे. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या खास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏













