खडकी / प्रतिनिधी : दि. 14 नोव्हेंबर — भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व समाजसुधारक, क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आज महात्मा गांधी चौक येथे खडकी कॅन्टोन्मेंट काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशाच्या आणि समाजाच्या निर्मितीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास खडकी बाजार परिसरातील विविध सामाजिक, राजकीय, व्यापारी मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. विशेषतः खडकी मातंग समाजाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नेहरूंचे लोकशाहीच्या मूल्यांवरील योगदान, तर लहुजी वस्ताद साळवे यांचे बहुजनांच्या हक्कांसाठीचे लढे यावर वक्त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आयोजन खडकी कॅन्टोन्मेंट काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सेल्वाराज अँथनी यांनी केले. यावेळी उपस्थितांनी पंडित नेहरू व वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मानवंदना दिली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















