Homeपुणेइनर व्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज तर्फे कातकरी कुटुंबियांना दिवाळी फराळ, साड्या...

इनर व्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज तर्फे कातकरी कुटुंबियांना दिवाळी फराळ, साड्या व जीवनोपयोगी साहित्य वाटप

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

मोहोळनगर येथे समाजसेवेचा सुंदर उपक्रम; गरजू कुटुंबियांना सणाच्या आनंदात सहभागी करून दिले – अध्यक्षा उज्ज्वला नवले यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम यशस्वी

हिंजवडी / प्रतिनिधी : दि. १७ ऑक्टोबर                  इनर व्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज तर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मोहोळनगर (ता. मुळशी) येथील कातकरी समाजातील गरजू कुटुंबियांना दिवाळी फराळ, साड्या आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश गरजू कुटुंबियांना सणाचा आनंद अनुभवता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलावे हा होता.
या कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षा उज्ज्वला नवले, सचिव सुविधा, तसेच देवयानी, गौरी, सुनिता, डॉ. मीनाक्षी आणि मैथिली यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला आणि समाजसेवेचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला. कार्यक्रमात विविध प्रकारचा दिवाळी फराळ, साड्या आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्य पद्धतीने पार पडले. तेथील शिक्षक सुदाम पवार यांनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.
कातकरी कुटुंबीयांनी इनर व्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमामुळे समाजात आपुलकी, सद्भावना आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Oplus_131072
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!