Homeपुणेहिंजवडी जि.प. गटात 15 तर दोन पं.स. गणात 23 उमेदवारांचे अर्ज वैध

हिंजवडी जि.प. गटात 15 तर दोन पं.स. गणात 23 उमेदवारांचे अर्ज वैध

हिंजवडी | प्रतिनिधी : दि. २३ जानेवारी २०२६
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी जिल्हा परिषद गट तसेच गणराई व सहा गणांमधील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तीन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत अर्जांची सखोल तपासणी करण्यात आली.

हिंजवडी जिल्हा परिषद गटासाठी एकूण 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या दोन गणांमध्ये मिळून 23 उमेदवारांचे अर्ज छाननीनंतर पात्र ठरवण्यात आले आहेत. गुरुवारी  पार पडलेल्या अंतिम छाननीनंतर ही यादी निश्चित करण्यात आली.
छाननीदरम्यान काही उमेदवारांचे अर्ज अपूर्ण कागदपत्रे, नियमांची पूर्तता न झाल्याने बाद करण्यात आले, तर बहुसंख्य अर्ज वैध ठरले असल्याने आता निवडणूक लढती अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
■ अपक्षांची भूमिका ठरणार निर्णायक
या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने निकालावर त्यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. मतविभागणी रोखण्यासाठी पक्षांकडून पुढील टप्प्यात जोरदार रणनीती आखली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
■ माघारीची मुदत महत्त्वाची
अर्ज छाननीनंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रचाराला वेग येऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!