Homeपिंपरी चिंचवडहिंजवडीत आणि मारुंजी त अवजड वाहनांचा कहर; २० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

हिंजवडीत आणि मारुंजी त अवजड वाहनांचा कहर; २० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

जांबे–मारुंजी रस्ता ‘डेथ झोन’ की सुरक्षिततेचा बोजवारा?
हिंजवडी / प्रतिनिधी : दि. १८ नोव्हेंबर                    जांबे–मारुंजी रस्त्यावर अवजड वाहनाने दिलेल्या जबर धडकेत तरुणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना  १७ नोव्हेंबर सोमवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली. तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्ता, हिंजवडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या दुर्दैवी अपघातात तिचे वडील सिद्धेश्वर लक्ष्मण साखरे (वय ४५) जखमी झाले आहेत.
ही घटना लाईफ रिपब्लिक सोसायटीसमोर सावंत पार्क चौकाजवळ घडली. तन्वी हिच्या निधनाने हिंजवडी, मारुंजी, जांबे परिसरासह आयटी पार्क भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तन्वी ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. अपघाताच्या वेळी ती आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून (MH 14 KV 3883) मारुंजीकडे जात होती. दरम्यान, मागून येणाऱ्या डंपरने (MH 14 HU 9855) दिलेल्या धडकेत ती चाकाखाली येऊन जागीच मयत झाली. तिचे वडील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर डंपर चालक अजय अंकुश ढाकणे (वय २०, रा. जांबे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
हिंजवडीत अवजड वाहनांचा कहर; मृत्यूंची मालिका थांबेना
हिंजवडी आणि आसपासच्या भागात अवजड वाहनांच्या धडकांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. स्थानिक नागरिकांकडून अनेकदा आक्रोश व्यक्त करण्यात आला असून अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.
१० ऑक्टोबर : माण–हिंजवडी रस्त्यावर ‘स्ट्रीट्स ऑफ युरोप’ मॉलसमोर डंपरखाली तरुणी ठार.
सुमारे दीड-दोन महिने पूर्वी : पीएमपीएमएल बसखाली येऊन एक तरुणीचा मृत्यू.
२४ जानेवारी २०२५ : वडजाई नगर येथे बेदरकार डंपर दोन तरुणींवर कोसळून त्यांचा मृत्यू.
नेरे परिसर : तरुणाचा डंपरखाली येऊन मृत्यू.
तसेच आणखी काही अपघातात नागरिक अपंगत्वाला सामोरे गेले आहेत.
स्थानिकांच्या मते, मागील वर्षभरात ७-८ जणांचा मृत्यू अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीमुळे झाला आहे.

नागरिकांची मागणी : “विकास हवा, पण लोकांच्या सुरक्षेच्या किंमतीवर नाही”
रोज वाढणारी रहदारी, संकुचित रस्ते आणि अवजड वाहनांचा बेदरकार वेग — या सर्वांचा परिणाम म्हणून निरपराध जीव गमावले जात आहेत.
स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि वारंवार अपघातांना सामोरे जाणारे आयटी कर्मचारी प्रशासनाकडे एकच मागणी करत आहेत—
“हिंजवडी–मारुंजी–जांबे परिसरात तातडीने वाहतूक शिस्त, वेगमर्यादा, अवजड वाहनांवर नियंत्रण आणि सुरक्षिततेची पावले उचलावीत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!