पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
पुणे / प्रतिनिधी : बुधवार ता. १ ऑक्टोबर
प्रत्येक वर्षी विजयादशमी हा नवनिर्मिती व विस्ताराचा सण मानला जातो. यंदा याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या सनीज वर्ल्डतर्फे नव्या भव्य ‘द डायमंड’ वेडिंग हॉल’ चा शुभारंभ होत आहे. गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
२०१६ साली सनीज वर्ल्ड येथे ‘द कोहिनूर’ वेडिंग हॉलचे उद्घाटन झाले होते. गेल्या दहा वर्षांत सनीज वर्ल्डने ११ हॉल्स, ७ लॉन्स, ३ मल्टिक्युझीन रेस्टॉरंट्स आणि ४०० जणांना राहण्यासाठी अत्याधुनिक सुविधा यशस्वीरित्या उभारल्या आहेत. आज ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘एंटरटेनमेंट पार्क’ म्हणून नावारूपाला आले असून, या प्रवासात विस्ताराचा आणखी एक टप्पा गाठत ‘द डायमंड’ हॉलचे उद्घाटन होत आहे.
या भव्य सोहळ्याचे आमंत्रक माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, “विजयादशमी हा शुभ दिवस मानला जातो. नागरिकांना दर्जेदार सोयी-सुविधा देत सनीज वर्ल्डचे कुटुंब सतत विस्तारत आहे. ‘द डायमंड’ वेडिंग हॉल हा त्याचाच एक भाग आहे.”
सनीज वर्ल्डच्या या नूतन उपक्रमामुळे पुणेकरांना विवाहसोहळे व विविध कार्यक्रमांसाठी आणखी एक भव्य, आधुनिक आणि दर्जेदार स्थळ उपलब्ध होणार आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















