Homeपिंपरी चिंचवडलक्ष्मी चौक ते मारुंजी दरम्यानचे ‘जगातील सर्वात उंच’ म्हणून चर्चेत असलेले स्पीडब्रेकर...

लक्ष्मी चौक ते मारुंजी दरम्यानचे ‘जगातील सर्वात उंच’ म्हणून चर्चेत असलेले स्पीडब्रेकर हटविले; वाहनचालकांना दिलासा

हिंजवडी / प्रतिनिधी : लक्ष्मी चौक ते मारुंजी दरम्यानच्या मार्गावर असलेले वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरलेले व ‘जगातील सर्वात उंच स्पीडब्रेकर’ म्हणून चर्चेत असलेले गतिरोधक अखेर प्रशासनाकडून हटविण्यात आले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अलीकडेच स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते लक्ष्मी चौक ते कासारसाई रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन पार पडले. त्याआधी हिंजवडी–माण–मारुंजी–जांबे–नेरे दत्तवाडी परिसरातील रस्ता विस्ताराच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे ६ वाजता सविस्तर पाहणी केली होती. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे सर्व प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम त्वरित हटविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले होते.

oplus_34

या आदेशांनंतर अवघ्या महिनाभरात PMRDA मार्फत हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे दत्तवाडी परिसरातील अतिक्रमण हटविणे, भूसंपादन प्रक्रिया आणि रस्ता मोकळा करण्याची कामे वेगाने पूर्ण करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवर परिणाम करणारे उंच स्पीडब्रेकर हटविणे ही त्याच प्रक्रियेचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला.
दरम्यान, येत्या काही दिवसांत या मार्गावर सायकल मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार असल्याने रस्त्याच्या कामांना अधिक वेग देण्यात येत आहे. सुधारित रस्ता, अतिक्रमणमुक्त मार्ग आणि हटविलेले स्पीडब्रेकर यामुळे वाहतूक सुलभ होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!