हिंजवडी / प्रतिनिधी : दि. २० जानेवारी २०२६ आज दुपारी पुण्यातील ऐतिहासिक बजाज पुणे ग्रँड सायकल टूर २०२६ स्पर्धेत पहिल्या टप्प्यादरम्यान मोठा अपघात झाला. मुळशी–कोळवण रस्त्यावरची अरुंद सुरुवात आणि तीव्र वळण यामुळे स्पर्धेदरम्यान मागील गटातील खेळाडूंचा सायकलवरील ताबा सुटला आणि पुढील सुमारे ५०–७० सायकलपटूंनी एकमेकांवर जोरात धडक दिली. या साखळी अपघातात अनेक सायकलस्वार जखमी झाले आहेत आणि काही खेळाडूंना स्पर्धा पूर्ण करता आली नाही.
घटनेनंतर तात्काळ तिथे उपस्थित रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकांनी जखमी खेळाडूंना प्राथमिक उपचार दिले आणि पुढील उपचारांसाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. आयोजकांनी त्वरित नियंत्रणासाठी मार्ग साफ केला आणि रस्त्यावरील परिस्थिती योग्य प्रकारे सांभाळली.
या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (UCI) च्या मान्यतेसह आणि पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने होत आहे. अपघातानंतर सुरक्षा आणि रस्ता नियोजनाबाबत प्रशासकीय तयारीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि आयोजकांनी पुढील टप्प्यांसाठी सुरक्षा अधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















