पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
पुणे : पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत “दिया आयुर्वेदिक सेंटर” या मसाज सेंटरच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाने बनावट ग्राहक पाठवून ही माहिती तपासली आणि त्यानंतर छापा टाकला. या कारवाईत एक पीडित महिला मुक्त करण्यात आली असून, सेंटरची मालक आणि मॅनेजर कविता आनंद शिंदे हिच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार ता. २५ सप्टेंबर ला घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात विविध ठिकाणी मसाज सेंटर, आयुर्वेदिक किंवा स्पा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारींवरून तपास सुरू आहे. पोलिस वेळोवेळी अशा ठिकाणी छापे टाकत असून, पीडित महिलांची सुटका केली जाते.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर धंद्यांबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















