गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे समाजभूषण, विद्यार्थी सन्मान आणि वधू-वर परिचय मेळावा यशस्वी आयोजन
पुणे / विशेष प्रतिनिधी : दि. १३ नोव्हेंबर पुणे जिल्हा कुंभार समाज उन्नती मंडळाचा वार्षिक कौटुंबिक स्नेहमेळावा गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे सरचिटणीस सुभाष तेटवार यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
कार्याध्यक्ष विशालशेठ शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर कु. तनया झोजे हिने स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अध्यक्ष बाबाजी कुंभार यांनी प्रास्ताविकातून मंडळाचे उपक्रम आणि भविष्यातील सामाजिक कार्यांचा आढावा घेतला.
या प्रसंगी आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार – डॉ. उदयन दीक्षित
समाज भूषण पुरस्कार – बाळासाहेब कुंभार (जेजुरीकर)
स्व. प्रमोददादा भिगवणकर समाजकार्य गौरव पुरस्कार (मरणोत्तर)
तसेच दहावी, बारावी, पदवी, पदविका आणि खेळ क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. समाजातील नवीन पदाधिकाऱ्यांचेही स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार गजानन भागवत यांना देण्यात आला.

प्रकाश रसाळ (मानपत्र लेखन) आणि प्रवीण बावधनकर (मूर्तीकला संवर्धन) यांचा विशेष सन्मान झाला. दिगंबर इंगळे यांनी ‘कुंभविकास’ या वार्षिक साप्ताहिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले.
महिला आघाडी अध्यक्षा उषाताई सोमवंशी यांनी समाजातील पाच विद्यार्थ्यांना एकूण ₹२५,००० शिष्यवृत्ती वितरित केल्या. तसेच गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
संजय जोरले यांनी समाजाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केले, तर आमदार हेमंत रासने यांनी विद्यार्थ्यांचा आणि समाजसेवकांचा सन्मान म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचे मत व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी विविध शासकीय योजना आणि समाजाला मदतीचे आश्वासन दिले.
सरचिटणीस सुभाष तेटवार यांनी समाजातील एकता, शिक्षण, व्यवसायविकास आणि युवक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
समाजभूषण व कार्याध्यक्ष सतीश दादा पाषाणकर, श्रीराज भरणे, मोहनराव जगदाळे, शामशेठ राजे, नगरसेवक सचिन पाषाणकर, सचिन कुंभार देहुकर, दत्तात्रय डाळजकर, सुरेश कोते, डॉ. मिलिंद भोई, सुवर्णाताई कुंभार, शशिकलाताई कुंभार, सुरेखाताई पाषाणकर, रोहिणीताई पवार, कैलास मांडेकर, अशोक पलांडे, डॉ. प्रमोद मोघे, डॉ. जयंत गाडगीळ, डॉ. शुभांगी उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वधू-वर परिचय मेळावा
दुपारच्या सत्रात वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. जवळपास ११० वधू-वरांनी नोंदणी केली होती. ज्योतिषाचार्य चिवटे शास्त्री व डॉ. मनिषा खैरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रद्धा शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा, युवा व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे केले.
कार्यक्रमासाठी भाऊसाहेब कुंभार (धायरीकर) यांचे विशेष सहकार्य लाभले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र जगदाळे यांनी तर आभार उपाध्यक्ष नितीन कुंभार यांनी मानले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















