पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
बोपोडी / प्रतिनिधी : दि. १० ऑक्टोबर
बोपोडी येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला विद्यालयाच्या सन १९९१-९२ च्या बॅचचा संस्मरणीय स्नेहमेळावा पिंपळे गुरव येथील हॉटेल राधाकृष्ण वर्ल्ड ऑफ व्हेज येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
या मेळाव्यात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भेटीतून वातावरण भावनिक व आनंदी झाले. या कार्यक्रमाला रजनी कर्णे, रंजना टंकसाळे, इंदिरा नागपुरे, रेहाना इनामदार (शेख), सुमित्रा स्वामी, डॉ. प्रफुल्लचंद्र चौधरी, कमलाकर पाटील, डॉ. अजयकुमार लोळगे, सीताराम वाघ, विश्वंभर हजारे, रामदास पोखरकर, देविदास सरोदे, दिलीप काटे, सोमा घुटे या मान्यवर शिक्षकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कुरणे यांनी केले, तर प्रस्तावना डॉ. साईनाथ गायकवाड यांनी सादर केली.
३३ वर्षांनी एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या सहाध्यायींची ओळख, यशस्वी जीवनप्रवास आणि शालेय दिवसांच्या गमतीजमतींना उजाळा दिला. डॉक्टर, वकील, शिक्षक, अभियंते, बँक अधिकारी, उद्योगपती आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले हे विद्यार्थी आज समाजात प्रतिष्ठेने कार्य करत आहेत. विशेष म्हणजे, चित्रपट सृष्टीत कार्यरत प्रशांत निघोजकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.
शिक्षकांच्या सत्कारानंतर त्यांनी विद्यार्थ्यांबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा देत काही गमतीदार किस्से सांगून कार्यक्रम रंगतदार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजना टंकसाळे मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आयोजक समितीचे कौतुक केले.
सौ. सुरेखा जाधव (गायकवाड) यांनी अध्यक्षीय भाषणातून सर्वांना एकत्र आणल्याबद्दल आनंद व्यक्त केला, तर श्री. नंदू लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
५० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मेळाव्याला हजेरी लावली. स्नेहभोजनानंतर सर्वजण आपल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला शाळेत भेटीसाठी गेले. वर्गात ‘तास’ घेतल्याची गंमत अनुभवत सर्वांनी जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात डॉज बॉल, क्रिकेट आणि संगीत खुर्ची सारख्या खेळांनी कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमाचा शेवट गळाभेटी, आनंदाश्रू आणि “पुन्हा भेटू” या भावनिक क्षणांनी झाला. ३३ वर्षांनंतर पुन्हा भेटलेल्या या शालेय मित्र-मैत्रिणींसाठी हा दिवस कायम स्मरणात राहील.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














