Homeपिंपरी चिंचवडआंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला दिलासा; उन्हाच्या तडाख्यात संरक्षणासाठी साहित्य वाटप

आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला दिलासा; उन्हाच्या तडाख्यात संरक्षणासाठी साहित्य वाटप

ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांचा पुढाकार; नगरसेवक माऊली जगताप यांच्या हस्ते आरोग्य सैनिकांना संरक्षण साहित्य वितरण

पिंपळे गुरव | पुणे पीसीएमसी न्यूज 24.live : 16 एप्रिल 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पिंपळे गुरव येथील कै. काळूराम जगताप बॅडमिंटन हॉलमधील आरोग्य कोठीत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे या उद्देशाने ओम साई फाउंडेशनच्या वतीने आरोग्य साहित्याचे वितरण करण्यात आले.
शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सध्या उष्माघाताचा वाढता धोका लक्षात घेता टोपी, अँप्रन आणि मास्क देण्यात आले. नगरसेवक माऊली जगताप आणि फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते हे साहित्य वितरित करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्ते साई कोंढरे यांनी, “समाजासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेऊन त्यांना मदतीचा हात देणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले. दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबवून ओम साई फाउंडेशन समाजाशी आपली बांधिलकी जपते, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक माऊली जगताप यांनी उपस्थितांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत, “उन्हाची तीव्रता वाढत असल्याने प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाला स्नेहल सोनवणे (आरोग्य निरीक्षक), अरुण जगताप (आरोग्य मुकादम), सुनील धावारे (बेसिक वॉर्ड इन्चार्ज), तौफिक सय्यद, रमेश गाढवे, सचिन खराडे, जगदीश बच्छाव यांच्यासह आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!