Homeपुणेस्वच्छतेच्या घोषणा हवेतच; बोपोडी परिसरात दुर्गंधीचे वास्तव निवडणूक जवळ, नागरिकांच्या आरोग्याचा...

स्वच्छतेच्या घोषणा हवेतच; बोपोडी परिसरात दुर्गंधीचे वास्तव निवडणूक जवळ, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दूर

बोपोडी / प्रतिनिधी : दि. १४ डिसेंबर २०२५                पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या बोपोडी परिसरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बोपोडी येथील वी. भा. पाटील पूल परिसरापासून मुंबई–पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या हायरिस ब्रिजपर्यंत, बोपोडी मैला पाणी शुद्धीकरण केंद्राच्या भिंतीलगत असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा व अस्वच्छता पसरलेली आहे.

oplus_34
oplus_34

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी नियमित स्वच्छता न झाल्याने दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून काही व्यक्तींकडून उघड्यावर लघुशंका केली जात असल्याने परिसरातील आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. विशेष बाब म्हणजे, याच ठिकाणी पुणे महापालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या देखील उभ्या असल्याचे चित्र दिसून येते.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या वतीने मैला शुद्धीकरण केंद्राच्या भिंतींवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी भित्तीचित्रे (पेंटिंग) करण्यात आली होती. तसेच नागरिकांसाठी पदपथावर दगडी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या बाकड्यांच्या आजूबाजूला सध्या कचऱ्याचे ढिग साचल्याने या सुविधांचा उपयोग होण्याऐवजी परिसर अधिक अस्वच्छ झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

oplus_34

‘माझा गाव, माझा अभिमान’च्या पलीकडे घाणीचे साम्राज्य सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असताना विविध पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त असले तरी या ठिकाणच्या स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष गेले नसल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. “आधी काम करा, मग निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा,” अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या परिसराच्या जवळच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते वास्तव्यास असतानाही, प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. ‘बोपोडी – माझा गाव, माझा अभिमान’ असा फलक चौकात लावण्यात आला असला तरी, त्याच परिसरात काही अंतरावर अस्वच्छतेचे चित्र दिसत असल्याने महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन परिसराची स्वच्छता, कचऱ्याची नियमित उचल व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी होत आहे. आता या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!