Homeपुणेसिंहगडावरील कथित वादग्रस्त फलक हटविला; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू – पुणे ग्रामीण...

सिंहगडावरील कथित वादग्रस्त फलक हटविला; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू – पुणे ग्रामीण पोलीस

खडकी | प्रतिनिधी : दि. 15 जुलै 2026              सिंहगड किल्ला परिसरात लावण्यात आल्याचा दावा असलेल्या वादग्रस्त फलक प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फलक किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील वाहनतळ (पार्किंग एरिया ) शेजारी असलेल्या जुन्या लोखंडी फलकावर अज्ञात व्यक्तींनी लावला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संबंधित फलक तात्काळ हटविण्यात आला.

दरम्यान, या फलकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनने पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे छायाचित्रांसह सविस्तर तक्रार दाखल केली. संस्थेने पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रूमकडे ई-मेलद्वारे तक्रार पाठविल्याची माहिती दिली आहे. तसेच पोलीस कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही संबंधित माहिती पाठविण्यात आल्याचे संस्थेने म्हटले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, फलक लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रवेश व निर्गमन मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले असून, निष्पक्ष तपास आणि कायद्यानुसार कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संस्थेने या प्रकरणात तातडीने दखल घेतल्याबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रतिसादाचे स्वागतही केले आहे.

(टीप : वरील वृत्तातील माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व संबंधित संस्थेने दिलेल्या निवेदनाच्या आधारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तपास सुरू असून पुढील अधिकृत माहितीनुसार बातमी प्रसिद्ध करण्यात येईल.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!