दारूंब्रे गावात मध्यरात्री बिबट्याचे थरारक दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 26 जानेवारी 2026
वेळ आली होती, पण देवाने वाचवले… याचा थरारक प्रत्यय (दि. 24 जानेवारी 2026 ) रात्री दारूंब्रे गावात आला. मध्यरात्री बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एम. मुल्ला हे रात्री सुमारे २ वाजता ड्युटीवरून घरी परतत असताना दारूंब्रे गावातील मुख्य चौकात हा थरारक प्रसंग घडला. चौकात असलेल्या एका चिकन दुकानाबाहेर पिंजऱ्यात बॉयलर कोंबड्या ठेवलेल्या असून, त्या कोंबड्यांच्या दिशेने बिबट्याची हालचाल सुरू असल्याचे मुल्ला यांच्या लक्षात आले.
मुल्ला यांनी दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता, दुचाकीच्या आवाजाने बिबट्या सतर्क झाला आणि थेट त्यांच्या गाडीसमोर धावत येऊन थांबला. काही क्षण बिबट्या दुचाकीसमोर उभा राहून मुल्ला यांच्याकडे पाहत होता. दुचाकीवर असल्याने धोका अधिक असल्याची जाणीव ठेवत, मुल्ला यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही हालचाल केली नाही.
सुमारे एक मिनिटानंतर बिबट्याने रस्त्यालगत असलेल्या ओढयात पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी मुल्ला हे त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यासाठी चौकात गेले. तेथे कात्रज दूध डेअरीचे मालक तेजस वाघोले यांच्याशी चर्चा केली असता, धक्कादायक माहिती समोर आली.
तेजस वाघोले यांनी सांगितले की, त्याच ठिकाणी त्याच रात्री सुमारे 11.30 वाजता बिबट्याचे दर्शन झाले होते, तसेच त्यांनी या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील चित्रीत केला आहे.
यामुळे एकाच रात्री, एकाच ठिकाणी—
▪️ रात्री 11.30 वाजता तेजस वाघोले यांना
▪️ आणि रात्री 2 वाजता एम. मुल्ला यांना
बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर दारूंब्रे गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. लहान मुले, महिला आणि रात्री कामावर जाणारे कर्मचारी धास्तावले आहेत.
“वनविभाग काय करत आहे?” असा थेट सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून, तातडीने पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
बिबट्या ला पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा
https://youtube.com/shorts/our-ABW1nM0?si=CgS5w7XcxwH3UDel

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















