Homeपुणेप्रभाग ८ मध्ये मतदार संभ्रमात; पक्ष पाहायचा की उमेदवार? जर उमेदवाराची निष्ठा...

प्रभाग ८ मध्ये मतदार संभ्रमात; पक्ष पाहायचा की उमेदवार? जर उमेदवाराची निष्ठा पक्षाशी स्थिर नाही, तर तो जनतेशी किती प्रामाणिक राहील?

हरीश शर्मा | मुख्य संपादक                                      पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बहुतांश राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत एक बाब प्रकर्षाने समोर येत आहे, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात पक्षांतर. अनेक उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे. कालपर्यंत ज्या पक्षावर टीका करणारे उमेदवार आज त्याच पक्षाचे झेंडे हातात घेऊन मतांची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवायचा की उमेदवारावर? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक ८ मध्ये ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. येथे अनेक उमेदवारांनी केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि तिकीट मिळवण्यासाठी पक्ष बदलल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. विकास, स्थानिक प्रश्न, नागरिकांचे प्रश्न यापेक्षा राजकीय सोयीस्कर भूमिका अधिक दिसून येत आहे.
मतदारांमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे की—
जर उमेदवाराची निष्ठा पक्षाशी स्थिर नाही, तर तो जनतेशी किती प्रामाणिक राहील?
आज पक्ष बदलणारा उद्या पुन्हा बदलणार नाही याची खात्री काय?
विकासासाठी लढणारा उमेदवार कोण, आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरलेला कोण?
लोकशाहीत पक्ष महत्त्वाचा असतो, पण व्यक्तीची भूमिका, कामाचा लेखाजोखा आणि सातत्य त्याहून अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे या निवडणुकीत मतदार भावनिक किंवा पक्षीय निष्ठेपेक्षा विचारपूर्वक निर्णय घेतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मतदार काय कौल देतील?
स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना नाकारतील की अनुभव आणि काम पाहून संधी देतील—
याचा निर्णय प्रभाग ८ मधील सुज्ञ मतदारच घेतील.
ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर मतदारांच्या राजकीय परिपक्वतेची कसोटी ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!