गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक-२ची धडाकेबाज कारवाई; वाळुंज टोलनाक्यावरून आरोपीला अटक
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला अवघ्या ४८ तासांच्या आत पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने अटक केली आहे. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
लष्कर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 49/2026 अंतर्गत कलम 103(1), 49, 3(5) तसेच आर्म अॅक्ट 4(25) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी तालीम सय्यद हा फरार होता. दरम्यान, आरोपी स्वतःच्या ओळखीच्या टुरिस्ट कारमधून अहिल्यानगर येथे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस हवालदार अनिल कुसाळकर, पोलीस हवालदार प्रदीप परीट आणि पोलीस शिपाई गणेश खरात यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीचा पाठलाग सुरू केला. आरोपी ज्या टुरिस्ट वाहनातून फरार झाला होता त्या वाहनाच्या चालकाला शिरूर येथे ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान चालकाने आरोपीला सुपा ला जाणाऱ्या रिक्षामध्ये बसवून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ती रिक्षा अहिल्यानगर रेल्वे स्थानक परिसरातून शोधून काढली. रिक्षाचालकाची चौकशी केली असता आरोपीला भिंगार कॅम्प येथील दमडी मशीद परिसरात सोडल्याचे समोर आले.
पुढील तपासात आरोपीच्या मित्राकडून माहिती मिळाली की आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी निघाला आहे. त्यानुसार पोलिसांनी वाळुंज पोलीस स्टेशनच्या मदतीने सापळा रचत वाळुंज नाका येथे आरोपीला ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राम राजमाने (खंडणी विरोधी पथक-२) यांनी दिली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















