पुणे | प्रतिनिधी : दि. १९ जानेवारी २०२६
पुणे शहरात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रेट चॅलेंज टूर 2026’ चे आयोजन 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आले असून या स्पर्धेचा प्रारंभ 19 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या आदेशानुसार स्पर्धा मार्गावरील वाहतूक निर्बंध लक्षात घेता 19 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरातील काही भागातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
■ कोणत्या भागातील शाळांना सुटी?
स्पर्धा मार्गामध्ये येणाऱ्या खालील परिसरातील शैक्षणिक संस्थांना सुटी राहणार आहे—
➡ छत्रपती शिवाजीनगर घोले रोड
➡ विश्रामबाग वाडा परिसर
➡ ढोले पाटील रोड
➡ भवानी पेठ
➡ औंध व बाणेर परिसर
➡ कोथरूड बावधन
➡ सिंहगड रोड
➡ वारजे-कर्वेनगर परिसर
या परिसरातील सर्व अंगणवाडी, शासकीय-खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व व्यावसायिक प्रशिक्षण संस्था या दिवशी बंद राहणार आहेत.
★ वाहतूक निर्बंधांचा परिणाम
स्पर्धेदरम्यान सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत स्पर्धा मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
■ जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















