पिंपरी | प्रतिनिधी : दि. १ एप्रिल २०२६ पावनभूमी पिंपरीगाव येथे गुरुवर्य सदगुरूंनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर (समाजभूषण – मावळ, मुळशी, हवेली, पिंपरी-चिंचवड) यांचा १०१ वा अभिष्टचिंतन सोहळा बुधवार, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार आहे.
या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ४ ते १० या वेळेत मुख्य कार्यक्रम पार पडणार असून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.
◆ कार्यक्रम रूपरेषा:
🔸 मंगळवार, ३१ मार्च २०२६
सकाळी ८ ते ११ – होम-हवन (जयबाबा निवास)
सकाळी ९ ते १२ – रक्तदान शिबिर
सकाळी ११.३० ते १.३० – गुरुवर्य बाबांची तुला
सायं. ५ ते ८ – अभंगवाणी कार्यक्रम
🔸 बुधवार, १ एप्रिल २०२६
दुपारी ४ ते ५ – भव्य मिरवणूक (जयबाबा निवास ते नवं महाराष्ट्र विद्यालय मैदान)
सायं. ५ ते ८ – कीर्तन सोहळा
रात्री ८ ते १० – महाप्रसाद
या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, संत-भक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















