Homeपिंपरी चिंचवडपत्रकारांना धमकी महागात पडणार? खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात पत्रकारांचा संताप...

पत्रकारांना धमकी महागात पडणार? खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात पत्रकारांचा संताप उसळला

मराठी पत्रकार संघाचा इशारा – “पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही”; कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या बातम्यांवर राज्यव्यापी बहिष्का

पिंपरी | प्रतिनिधी :दि. 27 जून 2026            पत्रकारांना धमकीची भाषा करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले असून, मराठी पत्रकार संघाने शुक्रवारी चिंचवड येथे जोरदार निदर्शने करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा देत संघटनेने संबंधित खासदारावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.
के. एस. बी. चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांनी फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. “पत्रकारांना धमक्या देणाऱ्यांना जनता उत्तर देईल”, “लोकशाहीचा चौथा स्तंभ झुकणार नाही”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, पुणे जिल्हाध्यक्ष संजय मराठे, विकास साळवे आणि संगीता पाचंगे यांनी आपल्या भाषणातून खासदारांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. पत्रकारांना गप्प बसविण्याचा प्रयत्न म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे सांगत, प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे कर्तव्य असून ते कोणत्याही दबावाखाली थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार!” या घोषवाक्याखाली पार पडलेल्या आंदोलनात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी विवेक कुलकर्णी, बजरंग मासाळ, संतोष महामुनी, रोहित खर्गे, नागेश खजुर्गीकर, पराग डिंगणकर, उमेश सणस, तौफीक सय्यद, गजाला सय्यद, आसीया इनामदार, उमेश पाटील, जगदीश बच्छाव यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला की, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पक्षाने तातडीने कारवाई केली नाही, तर राज्यभर शिवसेना पक्षाच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्यासह व्यापक आंदोलन उभारण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!