पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
औंध रोडवरील नव्या प्रवेशद्वारावरून सुरू झालेला वाद — सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांचा स्पष्ट आरोप : “हा विरोध फक्त राजकीय हेतूने प्रेरित आहे.”
खडकी / प्रतिनिधी : दि. ४ ऑक्टोबर
औंध रोडवरील सेंट थॉमस चर्च चौकाजवळ खडकी रेल्वे स्टेशनसाठी बांधण्यात आलेल्या नव्या प्रवेशद्वाराचा काही नागरिक आणि स्थानिक गटांकडून विरोध होत असला तरी, हा विरोध पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक अन्वर शेख यांनी व्यक्त केलं आहे.
शेख म्हणाले
“खडकी स्टेशन हे लवकरच एक महत्त्वाचं जंक्शन बनणार आहे. चार प्लॅटफॉर्म, प्रशस्त पार्किंग आणि आधुनिक सुविधा येथे उभारल्या जात आहेत. या नव्या गेटमुळे बोपोडी, औंध आणि खडकी परिसरातील नागरिकांना थेट रेल्वेसेवा मिळणार आहे. हा निर्णय जनहिताचा असून काहीजण शाळेच्या नावाखाली अनावश्यक राजकारण करत आहेत.”
त्यांनी स्पष्ट केलं की सेंट थॉमस स्कूलला आधीपासूनच पर्यायी प्रवेशद्वार उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होत नाही.
“शाळेच्या आडून राजकारण करणं थांबवावं. वास्तव हे आहे की शाळेला पुरेसा मागचा मार्ग आहे आणि रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या सूचनेनुसार तिकीट काउंटर आत हलवला आहे,” असे शेख यांनी सांगितले.
शेख पुढे म्हणाले ,
“खडकी स्टेशनला जंक्शन बनवण्याचं स्वप्न हे पुण्याचे तत्कालीन खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी तसेच बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि पर्यटन मंत्री चंद्रकांत छाजेड यांनी पाहिलं होतं. त्यांची दूरदृष्टी आज प्रत्यक्षात उतरत आहे. त्यामुळे नागरिकांनी या विकासात्मक उपक्रमाचं स्वागत करावं, विरोध नव्हे.”
नव्या गेटमुळे प्रवाशांना सुलभ प्रवेश, स्थानिक व्यापाऱ्यांना फायदा आणि वाहतुकीचा प्रवाह सुधारेल, असं शेख यांनी नमूद केलं.
“हा गेट म्हणजे फक्त प्रवेशद्वार नाही, तर खडकी परिसराच्या विकासाचं प्रतीक आहे,”
तर दुसरीकडे नवीन गेट होऊ नये यासाठी सेंट थॉमस शाळे कडूनही विरोध होत आहे तसेच बोपोडीतील राजकीय व्यक्ती नी ही याला कडाडून विरोध केला आहे त्यामुळे आता हे पाहणे महत्वाचे असेल की नवीन गेट होणार किंवा नाही

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















