“सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृतींचा निषेध, पण महिलांना मशिदीतून दूर ठेवणारी व्यवस्था बदललीच पाहिजे” – डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख
पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live | दि. १९ ऑक्टोबर शनिवारवाडा परिसरात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन ने आपली ठाम भूमिका मांडली आहे.
संस्थेच्या संस्थापिका डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख यांनी म्हटले की “सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतींचा आम्ही निषेध करतो, पण महिलांना मशिदीत प्रवेश नाकारला जातो हीच अशा प्रसंगांची खरी कारणमीमांसा आहे.”
त्यांनी सांगितले की शहरातील बहुतेक मशिदींमध्ये महिलांसाठी प्रार्थनेची योग्य व्यवस्था नसल्यामुळे काहींना सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करावी लागते.
डॉ. फरहा शेख गेल्या १० वर्षांपासून महिलांना मशिदीत प्रवेशाच्या घटनात्मक हक्कासाठी लढा देत आहेत, आणि या संदर्भातील याचिका सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनच्या मागण्या:
प्रशासनाने सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
ऐतिहासिक वास्तूंवरील धार्मिक कृतींसाठी स्पष्ट नियमावली तयार करावी.
मुस्लिम समाजाने महिलांसाठी मशिदीत सन्मानजनक प्रार्थनेची व्यवस्था करावी.
फाउंडेशनने स्पष्ट केले की ते शनिवारवाडा घटनेचे समर्थन करत नाहीत, परंतु महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे हीच अशा वादांची खरी मुळे आहेत.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















