विशेष बातमी – हरीश शर्मा – मुख्य संपादक
३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आरक्षण प्रक्रिया; २ डिसेंबरला अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार
पुणे / पिंपरी-चिंचवड : दि. 27 ऑक्टोबर 2025)
राज्य निवडणूक आयोगाने आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार प्रारूप आरक्षण निश्चित करणे, सोडत काढणे, हरकती स्वीकारणे आणि अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे या सर्व टप्प्यांसाठी निश्चित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
आरक्षण प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2025 – जागांची संख्या निश्चित करून राज्य निवडणूक प्रस्ताव सादर करणे.
8 नोव्हेंबर 2025 – आरक्षण सोडतीची जाहिर सूचना प्रसिद्ध करणे.
11 नोव्हेंबर 2025 – सोडत काढून राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी सादर करणे.
17 नोव्हेंबर 2025 – प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी नमुना प्रसिद्ध करणे.
24 नोव्हेंबर 2025 – हरकती व सूचना सादर करण्याचा अंतिम दिनांक.
25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 – प्राप्त हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त आदेशानुसार निर्णय घेतील.
2 डिसेंबर 2025 – अंतिम आरक्षणाचा नमुना शासन राजपत्रात प्रसिद्ध केला जाईल.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
या कार्यक्रमामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये निवडणुकांची औपचारिक तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आता अंतिम आरक्षण जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















