पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी / प्रतिनिधी: (दि. 2 ऑक्टोबर) येथील महात्मा गांधी चौक येथे खडकी कॅन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सेलवराज अंथॉनी यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तुषार गांधी, खडकीतील ज्येष्ठ व्यापारी रियाज घडीयाली शिवसेना कार्यकर्ते अशोक शिरसाट, महिला पदाधिकारी तसेच विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवनातील विचार, साधेपणा, प्रामाणिकपणा व देशभक्तीचा आदर्श पुढे मांडण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सेलवराज अंथॉनी यांच्या तर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सेलवराज अनथोनी यांनी खडकी मध्ये एकनिष्ठ काँग्रेस पक्षाचे कार्य केले आहे. एकेकाळी खडकी कॅन्टोन्मेंट मध्ये काँग्रेस ची एकहाती सत्ता होती मात्र मोदी लाटेनंतर काँग्रेस च्या अनेक नगरसेवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. मात्र तरीही सेलवराज अनथोनी काँग्रेस चा च झेंडा हातात धरला होता आणि आजपर्यंत त्यांनी खडकीत काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला आहे. पक्षाचे कोणतेही कार्यक्रम असो किंवा महापुरुषांची जयंती असो पुण्यतिथी असो अथवा कोणतेही शिबीर निवडणुकीत पक्षाने कोणालाही तिकीट दिले त्याचा प्रचारात ही कायम अग्रेसर सेलवराज म्हणजे खडकीत काँग्रेस अशी प्रतिमा खडकीत त्यांची तयार झाली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















