पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
पुणे / प्रतिनिधी : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच केंद्र सरकारमधील सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री सहायता कक्ष व धर्मदाय आयुक्त कार्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा, प्रलंबित अर्जांची स्थिती तसेच विविध मदत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
मोहोळ यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून, लाभार्थ्यांना वेळेत मदत पोहोचावी यासाठी कार्यप्रणाली अधिक गतीमान व पारदर्शक करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मोहोळ यांच्या या भेटीमुळे जिल्हा परिषदेतील मुख्यमंत्री सहायता व धर्मदाय आयुक्त कक्षाचे काम अधिक परिणामकारक होण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















