पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे / प्रतिनिधी
पुणे – तळजाई परिसरात ता.११ सोमवारी तळजाई परिसरात जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. यावेळी अड्ड्यावरती जुगार खेळताना एका भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह दोन ते तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याला पकडण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आणि सहकारनगर पोलिसांनी ही छापेमारी केली होती, औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे याच्यासोबत इतर दोन ते तीन जण जुगार खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे. कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात रमी खेळत होता. यावेळी सहकार नगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनने छापा टाकला असता ते सर्वजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














