Homeपिंपरी चिंचवडछत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर शौर्य, भक्ती व देशभक्तीचा संगम – कलाकारांनी...

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर शौर्य, भक्ती व देशभक्तीचा संगम – कलाकारांनी रंगवली शौर्यगाथा!

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live: तुळापूर: दि. २२ ऑक्टोबर : तुळापूर वढू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर आज एक अनोखा, प्रेरणादायी आणि देशभक्तीने भारलेला कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण केले. समाधी स्थळावर झालेल्या शौर्यपीठावरील या कार्यक्रमात भक्तीगीत, भावगीत, अभंग व पोवाड्यांच्या माध्यमातून महाराजांच्या अद्वितीय कार्यकर्तृत्वाची गाथा सादर करण्यात आली.
कार्यक्रमात अमोल देशमुख, बी जगन, देवदत्त राजगुरू, ख्वाजा शेख, किशोर गायकवाड, युवा शाहीर शुभम भुतकर, गुरुप्रसाद नानीवडेकर, तसेच कविता तरडे-फुगे, राजलक्ष्मी हवालदार, धनश्री वेदपाठक, शुभ्रा यांसह अनेक कलावंतांनी सुरेल सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
विशेष म्हणजे मध्यप्रदेश इंदोरहून सुट्टी काढून कार्यक्रमास उपस्थित झालेले किशोर गायकवाड, नाशिकला दिवाळी साठी जाण्याआधी कार्यक्रमास प्राधान्य देणारे देवदत्त राजगुरू आणि जालन्यातून उपस्थिती नोंदवणारे अशोक सुर्यवंशी यांची उपस्थिती ही त्यांच्या भक्तिभावाची आणि महाराजांप्रती निष्ठेची साक्ष देणारी ठरली.
वादक मंडळींनी देखील आपल्या वादनातून कार्यक्रमाला आत्मा दिला.
किबोर्ड – श्रीराम इंगळे, अशोक सुर्यवंशी; रिदम मशीन/ऑक्टोपॅड – सेनकुमार आव्हाड; तबला-ढोलकी – वैभव भोसले; ढोलक – दिलीप इंगळे; हार्मोनियम – गुरुप्रसाद नानीवडेकर; साऊंड – सुनिल पाटील (लकी साऊंड) व लाईट – सचिन लोखंडे, शुभम रांजणे, आकाश हुशारे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Oplus_131072

सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारे अतुल कड व सहकाऱ्यांचे “शौर्यगाथा” नाट्यप्रयोग हे विशेष आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांचा ऐतिहासिक प्रसंग सादर करताना कलाकारांनी ज्या प्रकारे अभिनय कौशल्य दाखवले, त्याने उपस्थितांमध्ये क्षणभर “शिवकाळ” जिवंत झाला.
कार्यक्रमाला ३,००० ते ३,२०० शिवभक्तांनी भेट दिल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली.
या प्रसंगी निवेदनाची सेवा करण्याचा सन्मान मिळाल्याबद्दल मुराद काजी यांनी आपल्या मनोगतातून आत्मिक समाधान व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसंकल्प प्रतिष्ठान तर्फे दोन कलाकारांना “जिरेटोप सन्मान” व छत्रपतींची अर्धाकृती प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. या वर्षी अतुल कड व संपूर्ण शौर्यगाथा टीम तसेच पं. सुरेश वाडकर यांचे शिष्य बी. जगन यांचा सन्मान करण्यात आला.
पुढील वर्षीचा सन्मान तबला वादक वैभव भोसले व ज्येष्ठ गायक अमोल देशमुख यांना जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमाचे यश सर्व कलाकार, सहकारी, वादक आणि शिवभक्तांच्या योगदानामुळे शक्य झाले.
कार्यक्रमाच्या यशासाठी मोलाचे योगदान दिलेल्या मुराद काजी, सुनिल पाटील, कविता तरडे आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!