Homeपुणेकला परिवार हडपसर सखी मंच ने घेतलेल्या पारंपरिक मंगळागौर स्पर्धेत जिजाऊ ग्रुप...

कला परिवार हडपसर सखी मंच ने घेतलेल्या पारंपरिक मंगळागौर स्पर्धेत जिजाऊ ग्रुप विजेता

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

पुणे / प्रतिनिधी :  काळानुसार लोप पावत असलेल्या भारतीय  कला संस्कृती रूढी परंपरा याचा वर्तमान काळात विसर पडत चालला आहे. या भारतीय संस्कृती कला रूढी परंपरा जिवंत ठेवण्याचे काम गेली अनेक वर्षे आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून ‘ हडपसर कला परिवार ‘ या सामाजिक संस्थेमार्फत केले जात आहे . याचाच एक भाग म्हणून ‘कला परिवार हडपसर सखी मंच’ तर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरातून अनेक महिला ग्रुप ने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला १६ वर्षाच्या तरुणींपासून तर ७५ वर्षाच्या ज्येष्ठ महिलांच ग्रुप स्पर्धेत सहभागी झाला होता . स्पर्धेच्या अंतिम उरुळी कांचन येथील ‘ जिजाऊ ग्रुप ‘ ला विजेता म्हणून घोषित करण्यात आले .

या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात उपस्तीथ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  माधुरी रासकर यांनी केले. त्यानंतर गणेश वंदना पुरुष नर्तक फिरोज मुजावर यांनी सादर केली.

स्पर्धेसाठी विविध ठिकाणांहून महिला ग्रुप सहभागी झाले होते. अंतिम फेरीत स्पर्धेत उरुळी कांचन येथील जिजाऊ ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. नक्षत्र ग्रुप, लोणी काळभोर यांनी द्वितीय क्रमांक तर हिरकणी ग्रुप, हेवन पार्क यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

टिंगरे नगर येथील सर्व रिटायर झालेल्या महिलांच्या ग्रुपने सुंदर सादरीकरण केले. त्यामुळे त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कला परिवार हडपसर सखी मंचच्या वर्षभर चालणाऱ्या  उपक्रमाबद्दल सर्व सदस्यांना प्रमिला लोखंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी शितल मुंडलिक यांनी उत्कृष्ट भारुड सादर केले. विजेत्यांना दत्ता दळवी, संजय ओसवाल, महेश ससाणे, बाळासाहेब केमकर, प्रमिला लोखंडे यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्व महिलांना सहभाग घेतल्याबद्दल नथ देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण आरती गुप्तास्वप्निल गायकवाड यांनी केले…
या कार्यक्रमाचे आयोजन संजीव रासकर, विनोद देशमुख, चेतना जाठवडेकर, अर्चना नाईक, शुभांगी देशमुख यांनी केले होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!