पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
पुणे / प्रतिनिधी : दि. १५ ऑक्टोबर
दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांवर होणारे वारंवार अन्याय आणि अत्याचार तातडीने थांबवावेत, तसेच प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात “पॅंथर स्टाईल” निवेदन ज्योती कदम ,जिल्हाधिकारी, पुणे शहर विभाग यांना देण्यात आले.
या वेळी ऑल इंडिया पॅंथर सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाजातील वंचित घटकांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आणि प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी संतोष शेंडगे संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य,
आशुतोष रवींद्र येरेल्लू कार्याध्यक्ष, पुणे शहर, अजिंक्य वंजारी उपाध्यक्ष, पुणे शहर, मनीषा कदम महिला कार्याध्यक्ष, पुणे शहर , संगीता चांगले अध्यक्ष, खडकवासला मतदारसंघ , सागर वानकर अध्यक्ष, लोणीकंद विभाग तसेच अरुण भालेराव, विशाल शिंदे, महादेव कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आशुतोष येरेल्लू यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि पॅंथर सेनेची लढाऊ भूमिका कायम राहील, असा संदेश दिला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














